निसर्गाच्या सान्निध्यात कृत्रिमरीत्या उबवली पानदिवड सापाची अंडी

वेंगुर्ले येथे आढळलेल्या पानदिवड जातीच्या सापाची अंडी उबवण्याचा कृत्रिम प्रयोग कोकण वाइल्डलाइफ रेस्क्यू पह्रम सिंधुदुर्ग या संस्थेच्या पुढाकाराने यशस्वी करण्यात आला. निसर्गाच्या सान्निध्यात कृत्रिमरीत्या उबवण्यात आलेल्या या अंडय़ातून तब्बल 18 पिल्लांनी जन्म घेतला आहे. वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी या पिल्लांना सुखरूपपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. सिंधुदुर्गातील हा पहिलाच प्रयोग असून तो यशस्वी झाल्याची माहिती कोकण वाइल्डलाइफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्गने सांगितले.

वेंगुर्ले येथे 4 मार्च रोजी पानदिवड जातीच्या सापाला एका घरातून पकडल्यानंतर त्या सापाला सोडण्यापूर्वीच त्याने बरणीमध्ये अंडी घातली होती.

कोकण वाइल्डलाइफची टीम त्या दिवड जातीच्या सापाच्या अंडय़ावर लक्ष ठेवून होती. पण हवा तसा प्रतिसाद सापाकडून मिळाला नाही. त्यामुळे शेवटी या टीमने ती अंडी निसर्गाच्या सान्निध्यात कृत्रिमरीत्या सहाय्याने उबवण्याचे ठरवले आणि शेवटी 42 दिवसांच्या कालावधीनंतर त्या अंडय़ातून 18 पिल्ले बाहेर आली. यासाठी मानद वन्यजीव रक्षक दप्तरदार सर, काका भिसे आणि पुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. योगेश कोळी यांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याचे अनिल गावडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या