कोपरगाव वनविभाग: दीड लाखांच्या वृक्ष रोपांची नासधूस; ३० जणांवर गुन्हा दाखल

201

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

तालुक्यातील करंजी येथील वन विभागाच्या राखीव जमिनीवर अतिक्रमण करून तेथे राहणाऱ्या आदिवासींनी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना वृक्ष लावण्यास मज्जाव केला तसेच दीड लाखांच्या वृक्ष रोपांची नासधूस केल्याप्रकरणी ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड व संवर्धन योजनेंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांना वृक्ष लावण्यास आदिवासी ७ पुरुष व २३ महिलांनी जंगलात मज्जाव केला. राखीव वनामध्ये अपप्रवेश करून तेथील हद्दीच्या खुणा नष्ट करून झाडोरा साफ सफाई केली. बाजरी, मका पेरणी सुरु असताना गैर कायद्याची मंडळी जमा करून रोपे लागवडीच्या कामात अडथळा आणून काम बंद पाडले व वन अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून वृक्ष लावण्यास विरोध केला व सुमारे १ लाख ३७ हजार पाचशे रुपयांच्या वृक्ष रोपांची नासधूस केल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात वन परिक्षेत्र अधिकारी एस. एम जाधव यांनी गुन्हा दाखल केला असून सदर ३० आरोपींना न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना प्रथम न्यायदंडाधिकारी रफिक शेख यांनी आरोपींना १७ जुलै पर्यंत वन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या प्रकारानंतर वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांत घबराट निर्माण झाली असून या प्रकरणामुळे नगर येथून वन खात्याचा मोठा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता.

अटक केलेल्या ७ पुरुषांना नगर येथे तर २३ महिला आरोपींना येरवडा (पुणे )येथे रवाना करण्यात आले आल्याची माहिती सहायक वन संव्रक्षक आर. जी देवखिळे यांनी दिली.

रायभान विठ्ठल आहेर (४५), कुंज रतन आहेर (५६), भानदास कारभारी आहेर (४३), ज्ञानदेव विठ्ठल आहेर (४५), शिवाजी भिवा मोरे (४०), राजू काशिनाथ आहेर (४०), वाल्मिक रतन निकम (32), बबबाई शिवाजी मोरे (४५), लक्ष्मीबाई दत्तू आहेर (४०), अलका सोपान पवार (४०), भारती पांडुरंग निकम (२५), लताबाई रतन निकम (५५), कडू बाई अंबादास पवार (४०), हिराबाई शिवाजी आहेर (५०), मंदाबाई सुभाष आहेर (५५), सखुबाई बबन बर्डे (५५), मुक्ताबाई रामदास मोरे (५० ), मीराबाई सुरेश आहेर (५२), मीराबाई लक्षम आहेर (४५), उषा धर्मा मोरे (32), वित्ठाबाई निवृत्ती आहेर (६०), शोभा बाबासाहेब गायकवाड (२५), अलका भाऊराव आहेर (32), लता ज्ञानदेव आहेर (५०), मंदा भास्कर आहेर (24), गिरीजा बाई संपत आहेर (५५), मीराबाई भिका आहेर (५७), गंगू बाई यादव मोरे (४८), सत्त्याभामा भीमा गायकवाड (२०) आणि मोनिका ज्ञानदेव आहेर (३०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

उप वनसंरक्षक नगरचे आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वन संरक्षक आर.जी. देवखिळे, एस. आर. पाटील, के. आर. सोनवणे, वन परिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव, जी. डी. छबीलवाड, अश्विनी दिघे, प्रताप जाधव, गाडे बी. एस., एम. एल. मोरे यांचा समावेश होता. याकामी शहरातील एका महाविद्यालयाचे, शाळेचे विद्यार्थी मदत करीत होते. घटनास्थळी तहसीलदार योगेश चंद्रे यांनी भेट दिली.

आपली प्रतिक्रिया द्या