
सामना प्रतिनिधी । देवरुख
संगमेश्वर देवरुख रस्त्यावरील कोसुंब येथील एमआयडीसी रोडवर सकाळी ८ वाजता झालेल्या दुचाकी अपघातात प्रेमनाथ पवार वय ५० या ठेकेदाराचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे.
मयत प्रेमनाथ पवार व त्यांच्यासोबत एकजण बुलेटने जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. लोकांच्या लक्षात ज्यावेळी ही घटना आली तेव्हा दोघेही रस्त्याच्या बाजूला पडलेल्या अवस्थेत होते. यातील प्रेमनाथ पवार हे जागीच मयत झाले होते तर सहप्रवासी गंभीर अवस्थेत जखमी होता.































































