
सामना प्रतिनिधी । नरसी
कुंटूर येथील पू. साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय व बहुद्देशीय प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कुंटूर येथे आयोजित 6 व्या लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ ग्रामीण कवी इंद्रजित भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. तर या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ट विचारवंत तथा 89 व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. आणि स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी मारोतराव कदम कुंटूरकर हे सांभाळणार आहेत.
हे संमेलन दि. 30 डिसेंबर 2018 रोजी म. गांधी साहित्यनगरी, जि. प. हायस्कूल कुंटूर येथे संपन्न होणार आहे. सकाळी 9 वा ग्रंथदिंडीने समेलनाची सुरूवात होणार आहे. सकाळी 10 वा सर्वधर्मसमभाव विचारपीठावर उद्घाटन सोहळा होणार आहे. यात उद्घाटक डॉ. श्रीपाल सबनीस, संमेलनाध्यक्ष इंद्रजित भालेराव यांच्यासोबत राजेश देशमुख कुंटूरकर, डॉ. सुरेश सावंत, साहित्य संस्कृती मंडळाचे भारत सासणे, रेणू पाचपोर, ज्योतीराम कदम, रुपेश कुंटूरकर, सूर्यकांत पा. कदम, शिवाजी पा. होळकर, सूर्याजी पा. चाडकर, बालाजीराव पवार, माणिकराव लोहगावे, बाबुराव आडकिने, शरद सुभाष मरे आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
या सोहळ्यातच कुंटूच्या चळवळीचे पालक डॉ. सुरेश सावंत यांचा त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल विशेष सन्मान केला जाणार आहे. तसेच वाचनालयाचे पू.साने गुरुजी सेवासन्मान पुरस्कार संदीप राजेंद्र ठाकरे, दत्ता डांगे, वसंत सुगावे, संजयसिंह राजपूत यांना तर वाड्मय पुरस्कार दा.मा.बेंडे, डॉ. अनंता सूर यांना प्रदान केले जातील.
दुपारी 2 वाजता संत साहित्यातील बोली याविषयावरचा परिसंवाद डॉ. विठ्ठल जंबाले यांच्या अध्यक्षतेखाली होइल. यात शिवाजी आंबुलगेकर हे विचार मांडतील. यानंतर दुपारी 3 वा कथाकार विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली सौ. अनिता यलमाटे, बालाजी पेठेकर यांचे बहारदार कथाकथन होईल.
तर शेवटी सायंकाळी 4 वा. कवी केशव खटींग यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवर कवींचे कवीसंमेलन होईल. संचालन वीरभद्र मिरेवाड व अशोक कुबडे हे करतील. या कवीसंमेलनात प्रफुल्ल कुलकर्णी, प्रा. महेश मोरे, अमृत तेलंग, ज्ञानेश्वर शिंदे, श्रीनिवास मस्के, देवदत्त साने, डॉ. विनायक येवले, पंडित पा. बेळीकर, शेख निजाम गवंडगावकर, शिवा कांबळे, लक्ष्मण मलगीलवार, सौ. नंदा देशमुख, प्रा. शंकर राठोड, प्रदीप पाटील, मुरारी गायकवाड, बाबुराव विश्वकर्मा, नागोराव डोंगरे, बालाजी तुप्पेकर, प्रकाश पाटील, पांडुरंग पुठ्ठेवाड, शेख जाफर, शं.ल. नाईक, डॉ. गो.रा. परडे, संजय ठिकाणे, शिवाजी जोगदंड, श्रीराम गव्हाणे, बालाजी आलगुलवाड, बालाजी सोमठाणकर, व्यंकट आनेराये, माधव बैलकवाड, नागनाथ मामीडवार, सिध्दार्थ गजभारे, नितीन महादाळे, वर्षा सांगवीकर, गजानन आडकिने, दत्ता वंजे, ज्योती गायकवाड, वंदना मघाडे, नरेंद्र धोंगडे, गोविंदराव पुयड, विनोद गोरे, राहूल भगत, युसुफ शेख, विनोद झुंजारे, आत्माराम राजेगोरे, डॉ. व्यंकटी पावडे, जीवन वाघमारे, शिवाजी पोलसवार आदी मान्यवर कवी सहभागी होतील.
तेव्हा कुंटूर व नायगाव तालुक्यातील सर्व साहित्यप्रेमींनी या साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वागताध्यक्ष मारोतराव कदम, संयोजक राजेंद्र नालिकंठे, कार्यवाह शिवाजी आडकिने, सहकार्यवाह गजानन आडकिने, विनोद झुंजारे, युसुफ शेख, प्रल्हाद आडकिने, अविनाश मामीडवार संजय ठिकाणे व डॉ. बाळू दुगडूमवार यांनी केले आहे.






























































