AIIMS च्या डॉक्टरला दारू पाजून बलात्कार केला, गुन्हा दाखल होताच वरिष्ठ डॉक्टर फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरिष्ठ डॉक्टरने आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या पार्टीत दारू पाजून आपल्यावर बलात्कार करण्यात आला असा आरोप एम्सच्या एका डॉक्टरने केला आहे. या महिला डॉक्टरच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात FIR दाखल केली आहे. हे कळताच आरोपी डॉक्टर फरार झाला आहे. हौजखास पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटलंय की पीडिता आरोपीच्या घरी गेली होती. यावेळी त्याने तिच्यावर बलात्कार केला. 10 ऑक्टोबर रोजी आपल्यासोबत हा प्रकार झाल्याचं महिलेने म्हटलं आहे. पोलिसांनी दंडाधिकाऱ्यांसमोर पीडित महिलेचा जबाब नोंदवून घेतला आहे.

आरोपी हा एम्समध्ये वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कामाला आहे. पीडित महिला ही एम्समध्ये कनिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कामाला आहे. 10 ऑक्टोबरला आरोपीने त्याच्या घरी पार्टी ठेवली होती. यावेळी आरोपीने आपल्याला जबरदस्तीने दारू पाजली. दारू चढल्याने ती आरोपीच्याच घरी थांबली होती. यावेळी डॉक्टरने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने पोलिसांना सांगितलं की तिने बलात्काराला विरोध केला असता वरिष्ठ डॉक्टरने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.