लालूंच्या तब्येतीत सुधारणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात लालूंवर उपचार सुरू असून आणखी दोन दिवसांत त्यांना सीसीयू वॉर्डमधून सर्वसाधारण वॉर्डमध्ये हलविण्यात येईल, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

लालूंची मुलगी मिसा भारती यांनी ट्विट करून लालूंचा एक फोटो शेअर करत सर्वांचे आशीर्वाद आणि एम्समधील वैद्यकीय सुविधांमुळे लालूंच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे म्हटले आहे.