
पाटण तालुक्यातील काठी, अवसरी परिसरातील खुडपुलेवाडीकडे जाणाऱया रस्त्यावर भूस्खलन झाल्यामुळे त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी सुनील गाढे, तहसीलदार रमेश पाटील यांच्यासह महसूल व अन्य संबंधित विभागांच्या अधिकाऱयांनी भेट दिली. सध्या येथे एकेरी रस्ता सुरू करण्यात आला आहे. गावच्या वरच्या भागात असलेल्या शेडमध्ये काही कुटुंबांची तात्पुरत्या स्वरूपात राहण्याबाबत आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.


























































