
करदात्यांना 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता प्राप्तीकर विवरण पत्र विलंब शुल्कासह भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
प्राप्तिकर विभागाच्या माहितीनुसार संकेतस्थळावर नोंदवलेल्या 11.80 कोटी युजर्सपैकी 7.85 कोटी युजर्सनी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केली आहेत. याचा अर्थ सुमारे चार कोटी प्राप्तिकर विवरणपत्रं आजही अजून प्रलंबित आहेत. त्यांनी 31 डिसेंबर पूर्वी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणे आवश्यक आहे.
प्राप्तिकर कायद्याच्या नियमानुसार जर तुमचे करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर विलंब शुल्क एक हजार रुपये आहे. करपात्र उत्पन्न पाच लाखांपेक्षा अधिक असेल तर विलंब शुल्क पाच हजार रुपये आहे. या व्यतिरिक्त कलम 234ए, 234बी आणि 234सी अंतर्गत व्याज पण देय असते. विलंब शुल्क व व्याज भरूनच मग प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करता येऊ शकणार आहे.


























































