लातूर जिल्ह्यातील 66 शाळा सुरू, 3864 विद्यार्थी हजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यातील 66 शाळांमध्ये आज 3864 विद्यार्थी शाळेत उपस्थित राहिले. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे जारी केलेल्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच जिल्ह्यातील शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांची लगबग दिसून आली.

लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 1235 प्राथमिक शाळा व 49 जिल्हा परिषद प्रशाला आहेत. तसेच विभागाअंतर्गत 487 अनुदानित व विनाअनुदानित खाजगी प्राथमिक शाळा आहेत. यात मराठी माध्यमाच्या 270 प्राथमिक शाळा, उर्दू माध्यमाच्या 101 प्राथमिक शाळा व 116 इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा आहेत. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा बंद होत्या. कुठल्याही वर्गाची परीक्षा घेण्यात आली नाही. विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेश करते झाले मात्र शाळा कही सुरू झालेल्या नव्हत्या. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण नाहीत तेथे शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर लातूर जिल्ह्यात आज 66 शाळा सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये तीन हजार 864 विद्यार्थी उपस्थित राहिले, अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली. शाळा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक असल्याने काही शाळांना ग्रामपंचायतीने परवानगी दिली नाही त्यामुळे काही शाळा आज सुरू होऊ शकले नाहीत.