
लातूर जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी वादळी वारे आणि जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील निलंगा निलंगा शहर तालुक्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला.
निलंगा तालुक्यातील मौजे पिरुपटेलवाडी येथील ललिता नारायण इरलापले (अंदाजे वय 50 वर्ष ) व पायल सतिश इरलापले (अंदाजे वय 10 वर्ष ) आज दि.29/05/2021 रोजी यांचा शेतामध्ये चिंचचे झाडाखाली थांबले असता 4.30 वाजता विज पडुन मृत्यू झाला आहे. तर व्यकट रामराव इंगळे रा. हातरगा हालसी यांची म्हैस (वय 6 वर्ष ) दिनांक. 29/05/2021 रोजी सायंकाळी 5 वाजता विज पडूण मरण पावली.
अहमदपूर तालुक्यातील हडोळती, किनगाव आणि परिसरात मेघगर्जनेसह पाऊस झाला. उदगीर तालुक्यातील हेर, करडखेल, सताळा बु, वायगाव, डिगोळ परिसरात विजांसह व जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला आहे.शिरुर अनंतपाळ तालुक्यातील काही भागात पाऊस झाला. देवणी तालुक्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. लातूर, रेणापूर तालुक्यात ही ढगाळ वातावरण होते.




























































