
ट्रक्टर विकत घ्यायला पैसे नसल्याने लातूरच्या एका शेतकऱयाने अनोखा जुगाड केला आहे. या शेतकऱयाने भंगार बुलेटपासून ट्रक्टर बनवला आहे. हा ट्रक्टर शेतीतील मशागतीची सर्क कामे करण्यासोबत दीड टनापर्यंत ट्रॉलीही ओढतो.
निलंग्यातील मकबूल शेख या शेतकऱयाने कोणतेही तांत्रिक शिक्षण न घेता केकळ आपल्या अनुभवाच्या जोरावर ही कमाल करून दाखवलीय. सातवीपर्यंत शिकलेले मकबूल हे लहानपणापासून ट्रॅक्टर दुरुस्तीचे काम करतात. निलंगा शहरात त्यांचे शेती अवजारांचे वर्कशॉप आहे. या वर्कशॉपमध्येच त्यांनी या बुलेट ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. 2016 साली त्यांना ही कल्पना सुचली परंतु ट्रक्टर बनवण्यासाठी त्यांना 2 वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतर वर्षभर त्यांनी शेतात ट्रक्टरची ट्रायल घेतली.
मशागतीसह दीड टनापर्यंत ट्रॉलीही ओढणार
मकबूल यांच्याकडून बुलेट ट्रॅक्टर बनवून घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागतायत. आतापर्यंत महाराष्ट्रासह विविध राज्यांतील शेकडो जणांना त्यांनी बुलेट ट्रॅक्टर बनवून दिला आहे. मकबूल सांगतात, लहान शेतकऱयांना डोळ्यासमोर ठेवून मी या ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. कारण त्यांना सात ते आठ लाखांचा ट्रक्टर खरेदी करणे शक्य नसते. बुलेट ट्रॅक्टरमुळे त्यांना स्वस्तात मस्त पर्याय उपलब्ध झाला आहे. पेरणी, खुरपणी, कीटकनाशक फवारणी आणि नांगरणीसाठी या ट्रॅक्टरचा वापर केला जातो. 10 हॉर्स पॉवरचे इंजिन असलेल्या या ट्रक्टरची किंमत केवळ 1.60 लाख रुपये आहे.































































