
निलंगा तालुक्यातील मौजे हंगरगा सिरसी पाटीजवळ एका अवैध पशुंची वाहतुक करत असलेल्या कर्नाटक पासिंग असलेल्या पिकअप वाहनाने मोटरसायकलवरील दोघांना उडवले. हा अपघात सकाळी ७ वाजता भरघाव वेगात असल्याने पिकअपमुळे झाला आहे. या अपघातात मोटारसायकलस्वारासोबतचा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
निलंगा तालुक्यातील मौजे शेळगी, ता.निलंगा येथील राजकुमार मरळे आणि गोविंद शिंदे हे दोघे निलंगाकडे जात असताना हंगरगा सिरसी पाटीजवळ निलंगा येथुन येत असलेल्या भरघाव येत असलेल्या बोलेरो पिकअप वाहनाने या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या दोघांना लातूर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
या अपघातानंतर औराद शहाजानी येथील पोलीस प्रशासनाच्या वतीने घटनास्थळी भेट दिली. या बोलेरो पिकअपमध्ये असलेल्या पशुंना ताब्यात घेत घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.


























































