
सामना प्रतिनिधी । मुंबई
लालबाग स्पोर्ट्स क्लब या संस्थेच्या वतीने व शिवडी विधानसभा संघटक सुधीर साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत लक्ष्मीमाता संघाने अजिंक्य होण्याचा मान संपादन केला. याप्रसंगी विजेत्यांना सुधीर साळवी, लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, समाजसेवक राजेंद्र लांजवळ, लालबाग स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष राजन कोतावडेकर, सचिव राज पवार, कोषाध्यक्ष शुभम जाधव यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले.


























































