चीन सीमेवर तणाव, लष्करप्रमुख नरवणे लडाखला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्व लडाखच्या पँगॉग टीएसओ सरोवर परिसरात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न सुरुच असल्याने सीमेवर तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.हिंदुस्थान आणि चीनचे सैन्य आमने-सामने उभे आहे. सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे लडाखमध्ये दाखल झाले आहेत.

लष्करप्रमुख नरवणे यांनी लष्कराचे कमांडर्स आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. चीनने यापुढे कुरापती सुरूच ठेवल्यास योग्य प्रत्युत्तर देण्यास हिंदुस्थानचे जवान सज्ज आहेत. दोन्ही बाजूचे सैन्य आमने-सामने आहे.

चीन मागे हटण्यास तयार नाही; चर्चेच्या फेऱ्या सुरूच

चीनने एप्रिलपासून पूर्व लडाखच्या सीमेवर घुसखोरी केली आहे. 5 जूनच्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. आताही चर्चा सुरू आहे पण चीन पूर्णपणे मागे हटण्यास तयार नाही.

एप्रिलपूर्वीची स्थिती जैसे थे ठेवावी असे हिंदुस्थानचे म्हणणे आहे. चीनचे सैन्य फिंगर आठपर्यंत असते पण आता फिंगर चारपर्यंत आले आहे. गलवान खोNयातून मागे हटले. मात्र पँगॉग लेक परिसरातून चीन मागे हटत नाही. त्यामुळे तणाव वाढला आहे.

लष्कराने डाव उधळला

29-30 ऑगेस्टच्या रात्री चीनच्या सैनिकांनी पँगॉग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर घुसखोरीचा प्रयत्न केला. हिंदुस्थानी जवानांनी चीनचा डाव उधळून लावला. दरम्यान यावेळी जोरदार धुमश्चक्री झडली. त्यात हिंदुस्थानचा एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. मात्र, लष्कराने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. मात्र 31 ऑगेस्ट आणि 1 सप्टेंबरलाही चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला होता.