
संभाजीनगर-परभणी या महामार्गावरील गणेशपुर-वाघी रोडवर शुक्रवारी रात्री चार चाकीमधील प्रवाशांना रोडवर बिबट्या फिरताना आढळून आला आहे. बिबट्याला पाहातच त्यांनी रस्ता बदलला. तसेच ही माहिती आजुबाजुच्या परीसरातील नागरिकांना दिली आहे.
काही दिवसापूर्वी जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा-वडी शिवारातील परीसरातील एका शेतकरीच्या शेतात बिबट्याचे पिल्लू विहीरीत आढळून आले होते. दोन दिवसांपूर्वी वाघी येथील शिवारातील माळ रानात एका प्राण्यावर हल्ला झाला आहे. आता बिबट्या रोडवर फिरताना आढळ्यामुळे शेती पिकांना पाणी देण्यासाठी जाणारे शेतकरी व येथील प्रवासी भितीच्या सावटाखाली वावरत आहेत. वनविभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष देत तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.


























































