
रोज जेवण झाल्यानंतर बडीशेप खाणे ही अनेकांची सवय असते. काही जणांना तर जेवणानंतर अशा प्रकारे मुखशुद्धी केल्याशिवाय जेवण झाल्यासारखे वाटत नाही. बडीशेपमधील औषधी गुणधर्म आपले आरोग्य चांगले ठेवतात. बडीशेपमध्ये आयर्न, सोडिअम, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम इ उपयुक्त घटक असतात. रोज नित्यनेमाने बडीशेप खाणाऱ्या लोकांचे आरोग्य आणि रोग प्रतिकारशक्ती चांगली रहाते.
– बडीशेप चघळून खाल्ली जाते. यामुळे लाळ आपोआपच पोटात जाते. यातून एसिडीटी कमी होते, पचन सुधारते. तोंडाला येणारी दुर्गंधी नाहीशी होते.
– बडीशेप खाल्ल्याने शरीरातील विषयुक्त, टोक्सिक पदार्थ बाहेर टाकले जातात. यामुळे रक्तशुद्धी होते. आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे.
– बडीशेपमुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. त्वचेच्या पिंपल्स, मुरुम अशा तक्रारी दूर होतात. दररोज बडीशेप खाल्ली तर त्वचा सतेज व मुलायम होते.
– बडीशेपमध्ये पोटॅशिअम असते, जे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करते. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. हृदयरोग, ह्रदयविकार अशा शक्यता कमी होतात.
– बडीशेपमधील झिंक, कॅल्शियम आणि सेलेनियम हे घटक हार्मोन संतुलन करतात. शरीरात हार्मोनची योग्य ती पातळी राखली जाते. हा आरोग्याच्या दृष्टीने मोठा फायदा आहे.
– डोळ्यांच्या आरोग्यासाठी बडीशेप उपयोगी आहे. अँटीऑक्सिडेंट, ए व्हिटॅमिन, अमिनो ॲसिड डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवतात. सुंदर डोळे हवे असतील तर रोज बडीशेप खावी.
– स्मरणशक्ती वाढवायची असेल तर बदाम आणि बडीशेप एकत्र वाटून खावी. रोज जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने आरोग्य निरोगी राहते.



























































