दूध उभे राहून आणि पाणी बसून प्यावे, जाणून घ्या यामागचे कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयुर्वेदात खाण्यापिण्याबाबत अनेक नियम सांगितले जातात. या नियमांचे पालन केल्यास अनेक शारीरिक फायदे होतात. काही लोकांच्या पोटात दूध प्यायल्यानंतर गॅस होतो, तर काहींना पोट फुगल्यासारखे वाटते. यामागचे कारण म्हणजे अन्न खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे हा त्रास उद्भवू शकतो, असे आयुर्वेदात सांगितले आहे. चुकीच्या पद्धतीमुळे पाणी आणि अन्न ग्रहण केल्यामुळे शारीरिक त्रास होऊ शकतात. या त्रासांना सामोरे जावे लागू नये, याकरिता अन्नपदार्थ ग्रहण करण्याची योग्य पद्धत समजून घेणे आवश्यक आहे. दूध नेहमी उभे राहून आणि पाणी बसून प्यावे, असा सांगितले जाते, जाणून घेऊया याविषयी आरोग्य तज्ज्ञांचे मत.

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पाणी नेहमी बसूनच प्यावे, कारण बसून पाणी प्यायल्याने शरीरासाठी धोकादायक असणारी रसायने पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे रक्तही शुद्ध होते. याशिवाय अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. एकाच वेळी भरपूर पाणी पिऊ नये, त्यापेक्षा थोडे थोडे पाणी थोड्या थोड्या वेळाने प्यावे.
त्यामुळे उभे राहून दूध प्यावे

काही लोकांना दूध प्यायल्यानंतर पचनाचा त्रास होऊ शकतो. दूध प्यायल्यानंतर पचनक्रिया बिघडते. दूध प्यायल्यानंतर अनेकांना पोटातील गॅसचा त्रास होतो. ज्यांना अशा प्रकारचे त्रास होतात त्यांनी उभे राहून दूध पिण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. दूध नेहमी हलके गरम करावे आणि जेवल्यानंतर 2 तासांनी प्यावे. यामुळे गुडघे दुखायचे कमी होतील. अशा पद्धतीने दूध प्यायल्याने स्नायूंनाही फायदा होतो. स्नायूंचे आरोग्य सुधारते. यामुळे ह्रदयाचे आरोग्य उत्तम राहते आणि रक्तदाबही नियंत्रणात राहायला मदत होते.