रजोनिवृत्तीबाबत महिलांनी उघडपणे बोलणे गरजेचे, लारा दत्ताने व्यक्त केले मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रजोनिवृत्तीबाबत नुकतेच एका कार्यक्रमात लारा दत्ताने आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी ती म्हणाली, महिलांनी प्रायव्हेट पार्ट्स, रजोनिवृत्ती, मासिक पाळी यावर उघडपणे बोलायला हवे, चर्चा करायला हवी असे मत लाराने कार्यक्रमात मांडले.निमित्त होते ते अॅबॉटने रजोनिवृत्तीबाबत सुरु केलेल्या ‘द नेक्‍स्‍ट चॅप्‍टर’ मोहिमेचे.

माजी मिस युनिव्‍हर्स लारा दत्ता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. बुधवारी मुंबईत ‘द नेक्‍स्‍ट चॅप्‍टर’ मोहिमेतंर्गत घेतलेल्या कार्यक्रमात लारानेही उपस्थिती लावली होती. यावेळी लारा दत्ता आपले मत मांडताना म्हणाली की, महिलांचे प्रायव्हेट पार्टस, मासिक पाळी, रजोनिवृत्ती या सर्व गोष्टी कोणत्याही महिलेच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचे टप्पे आहेत. याबाबत उघडपणे फारसे बोलले जात नाही.हे विषय सार्वजनिकरित्या चर्चिले जात नाहीत. याबाबत जागरूकता निर्माण होण्याची गरज असून त्यासाठी कलाकारांनी आपले अनुभव कथन करायला हवेत. त्यांना प्रेरणा द्यायला हवी. तसेच महिलांनी प्रायव्हेट पार्ट्सबाबत उघडपणे चर्चा करणे गरजेचे असल्याचे लारा म्हणाली.

ऑक्टोबरमध्ये जागतिक रजोनिवृत्ती महिना साजरा करण्यासाठी जागतिक आरोग्यसेवा अग्रणी कंपनी अॅबॉट महिलांना जीवनाच्या या टप्प्यावर मुक्‍तपणे जगण्यासाठी सक्षम बनवण्याच्या प्रयत्नांचे नेतृत्व करत आहे. इप्सॉससोबत सहयोगासह अॅबॉटने नुकत्‍याच केलेल्‍या सर्वेक्षणानुसार 87 टक्‍के व्‍यक्‍तींना वाटते की, रजोनिवृत्तीचा महिलेच्या दैनंदिन जीवनावर लक्षणीय परिणाम होतो. तरीही, या विषयाबाबत फारशी चर्चा केली जात नाही. रजोनिवृत्ती हा एक असा टप्पा आहे, ज्याचा परिणाम सर्व महिलांवर त्‍यांच्‍या वयानुसार होत असल्याने जीवनातील या वेगळ्या टप्प्याबाबत महिलांमध्‍ये जागरुकता वाढवणे आणि त्यांना पाठिंबा देणे हे अॅबॉटचे उद्दीष्ट आहे.त्यासाठी अॅबॉटने ‘द नेक्‍स्‍ट चॅप्‍टर’ मोहिम सुरू करत आहे.

अॅबॉट इंडियाचे प्रादेशिक वैद्यकीय संचालक डॉ. पराग शेठ म्‍हणाले, ‘’अॅबॉटमध्‍ये महिलांना दीर्घायुष्य आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यास मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. रजोनिवृत्ती अनेक महिलांसाठी आव्हानात्मक असू शकते. आम्ही महिलांच्या रजोनिवृत्तीच्या अनुभवांबद्दल जागरुकता वाढवत आहोत, ज्‍यामुळे महिलांना रजोनिवृत्ती अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल, त्याबद्दल बोलण्यास अधिक सोयीस्कर वाटू शकेल आणि त्यांना जीवनाच्‍या या टप्‍प्‍यामध्‍ये पूर्णपणे जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेला पाठिंबा मिळेल. आमच्या प्रयत्नांच्‍या माध्‍यमातून आम्ही महिलांना त्यांच्या जीवनातील हा नवीन अध्याय स्वीकारण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत.”

‘द नेक्‍स्‍ट चॅप्‍टर’च्या कथांचे हे संकलन माजी मिस युनिव्‍हर्स लारा दत्ता, तसेच द फेडरेशन ऑफ ऑब्‍स्‍टेट्रिक अॅण्‍ड ग्‍यानेकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (एफओजीएसआय)चे नियुक्‍त अध्‍यक्ष प्रख्‍यात स्‍त्रीरोगतज्ञ ऋषिकेश पै, अपोलो व फोर्टिस हॉस्पिटल्‍सच्‍या कन्‍सल्‍टण्‍ट एण्‍डोक्रिनोलॉजिस्‍ट डॉ. तेजल लेथिया आणि शीदपीपलच्‍या संस्‍थापिका शैली चोप्रा यांच्‍या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्‍यात आला.