
संगमेश्वर तालुक्यातील पाचांबे नेरदवाडीत संजय जाधव यांच्या गुरांच्या गोठ्यावर वीज पडून शुक्रवारी रात्री आग लागली. या आगीत गोठा भस्मसात झाला आहे. गोठ्याला लागलेल्या आगीत 13 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यात 9 म्हशी, 2 रेडे आणि 2 वासरांचा समावेश आहे.
याप्रकरणी तालुका प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला असून पंचनाम्याचा अहवाल वरीष्ठांना सादर केल्याची माहिती मंडळ अधिकाऱ्याने दिली आहे. शुक्रवारी रात्री घरावर वीज पडून घराला आग लागल्याचे या पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. तसेच संजय जाधव यांचे 10 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.


























































