मेस्सीचा ’बिश्त‘ने सन्मान!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लिओनल मेस्सी फिफा वर्ल्ड कपच्या जगज्जेते पदाची ट्रॉफी घेण्यासाठी आला तेव्हा त्याने जर्सीवर बिश्त (काळा गाऊन) परिधान केला होता. कतारच्या मीर तमीम बिन हमद अल यांनी मेस्सीला हा खास बिश्त घातला. हे बिश्त काही साधेसुधे गाऊन नाही. उंटाचे केस आणि बकरीच्या लोकरीपासून हे खास कापड बनविले जाते. अशा प्रकाराचा गाऊन कतारमध्ये खास समारंभात परिधान केला जातो.

अर्जेंटिना चॅम्पियन झाल्यानंतर त्यांच्या संघाचा कर्णधार आणि जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेल्या मेस्सीला हा खास गाऊन घालून विशेष पद्धतीने सन्मानित करण्यात आले. अरब देशांमध्ये या गाऊनला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे बिश्त कोणतीही सामान्य व्यक्ती परिधान करू शकत नाही. हे वस्त्र धर्मगुरूंच्या व्यतिरिक्त शाही परिवारातील सदस्यच परिधान करू शकतात. मात्र हे गाऊन परिधान करून मेस्सी आला तेव्हा सर्वांच्या नजरा या काळ्या जाळीदार वस्त्र्ाावर वेधल्या गेल्या होत्या. मेस्सीने नक्की काय घातलेय, असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला होता.