Live : युतीची चर्चा गेली खड्ड्यात पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करता ते बोला !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,बीड

  • एक दुष्काळ मी हटवतो दुसरा (राजकीय) दुष्काळ तुम्ही हटवा
  • दुष्काळ गंभीर पण शिवसेना खंबीर
  • माणसांसाठी पाण्याच्या टाक्यांप्रमाणेच. जनावरांसाठी पाण्याचे हौदही शिवसेना देणार आहे
  • बीडमध्ये केंद्रीय पथक आल्यानंतर तुमच्या रेशनमध्ये कपात झाली, हे खरं आहे की खोटं ?
  • जर निर्णय न्यायालय देणार असेल तर मग तुम्ही जाहिरनाम्यात राम मंदिराचे वचन का दिलेत ?
  • ना तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकलात ना तुम्ही राम मंदिराचा मुद्दा सोडवू शकलात
  • पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झालाय
  • मी ‘मनकी बात’ नाही, ‘जनकी बात’ करतो
  • सामनामध्ये येते ते सत्यच असते
  • खरं बोलून एकही मत मिळालं नाही तरी चालेल पण खोटं बोलून मिळालेली मते नकोत  असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते
  • युतीची चर्चा गेली खड्ड्यात पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करता ते बोला
  • तुमचे दिवस राहिलेत तरी किती? उद्धव ठाकरेंचा सवाल
  • सरकारी यंत्रणेचा सुस्त पडलेला अजगराला ढोसण्यासाठी मी फिरतोय
  • मी पुन्हा मराठवाड्यात येणार आहे, ही माझी शेवटची भेट नाही
  • मग ते लेझिम पथक होतं का बँजो पथक !
  • केंद्रीय पथक येऊन गेलं, तुमच्या हातात काही मदत पडली का ?
  • दुष्काळ पडल्यानंतरही दुष्काळ दिसायलाही यांना यंत्रणा लागते
  • स्वस्तामध्ये घर देईन नुसतं असं बोलून घर मिळतं का ?
  • कोरडी भाषणं आणि कोरड्या घोषणांनी हंडे भरत नाही
  • दिवाळीमध्ये रामदास कदम यांनी शिवसेनेतर्फे ५ हजार कुटुंबीयांना धान्य वाटप केले होते
  • आपला कोण आणि थापाड्या कोण हे आता ओळखायला पाहिजे
  • नवं वर्षात अच्छे दिनच नाही तर अच्छी वर्षही येऊद्या अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो
  • नवीन वर्ष सुरू होऊन 8-10 दिवस झालेत
  • आशीर्वाद लॉन्समधील सभेला सुरुवात
  • उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटप

  • शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मंचावर आगमन
  • उद्धव ठाकरे बीडवासीयांना आणि शेतकऱ्यांना संबोधित करणार
  • थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे आगमन होणार
  • संधीसाधू येती घरा, समजा निवडणुका आल्या- उद्धव ठाकरे
  • निर्लज्ज, निर्घृणपणा शिवसेनेला जमणार नाही
  • गाई-बैलाची जबाबदारी घेतल्यानंतर आपण त्याचे पालक होतो, ते आपले धन आहे- उद्धव ठाकरे
  • सत्ता असली काय नसली काय, मी तुमच्या सोबत आहे-उद्धव ठाकरे
  • मी इथे ऋण व्यक्त करायला आलो आहे-उद्धव ठाकरे
  • कोरडी भाषणं ठोकून उपयोग नाही,घोषणांचा पाऊस खूप होईल पण त्याने तुमचे हंडे भरणार नाही-उद्धव ठाकरे
  • माझ्या शेतकरी दादांनो म्हणत उद्धव ठाकरे यांनी संबोधित करायला सुरुवात केली
  • दुष्काळ गंभीर तिथे उद्धव ठाकरे खंबीर-रामदास कदम
  • दुष्काळग्रस्तांसाठी पाण्याच्या टाक्यांचे वाटप केले जाणार, दुष्काळग्रस्तांसाठी धान्याची मदतही केले जाणार
  • उद्धव ठाकरे इथे राजकारण करण्यासाठी नाही तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आले आहेत-रामदास कदम
  • फोटोंचे प्रदर्शन भरवून त्यातून जमा झालेली रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्धव ठाकरेंनी दिली-रामदास कदम
  • २७ हजार शेतकऱ्यांच्या घरी धान्य पोहचवले-रामदास कदम
  • मराठवाड्याचा शेतकरी अडचणीत सापडलेला असताना त्यांना मदत करणारा एकमेव नेता म्हणजे उद्धव ठाकरे-रामदास कदम
  • चारा वाटप कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे यांचे म्हाळसजवला येथील मंचावर आगमन
  • चारा वाटप शुभारंभासाठी उद्धव ठाकरे म्हाळसजवला कडे रवाना
  • उद्धव ठाकरे यांचे बीडमध्ये आगमन
  • उद्धव ठाकरेंच्या दुष्काळी दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष
  • बीड तालुक्यातील म्हाळसजवळा येथे सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटप करण्यात येणार आहे.
  • शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दुष्काळी दौरा थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.