कंटेन्मेंट झोनमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन

देशभरात कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधित क्षेत्रात मात्र लॉकडाऊन कायम राहणार आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केले आहे. दरम्यान, कंटेन्मेंट झोन वगळता सर्वत्र अनलॉक-6 ची प्रक्रिया सुरू झाली असली तरी गेल्या महिन्यात जाहिर केलेल्या अनलॉक-5 मधील नियम, अटी-शर्ती यापुढेही कायम राहणार आहेत.

24 मार्च रोजी देशभरात पहिला लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यानंतर 31 मेपर्यंत लॉकडाऊनचे चार टप्पे झाले. 1 जूनपासून 1 ऑक्टोबरपर्यंत अनलॉकचे पाच टप्पे झाले आहेत. सध्या अनलॉकचा पाचवा टप्पा सुरू आहे. मात्र, देशभरात 240 दिवसानंतरही काही शहरांमधील भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हे प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोन असून तेथे 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. कोरोना रोखण्यासाठी जे निर्बंध यापूर्वी होते ते 30 नोव्हेंबरपर्यंत कंटेन्मेंट झोनमध्ये सुरूच राहतील. या झोनमधील चाचण्या वाढविण्यात येणार आहेत.

  • अनलॉकबाबत परिस्थिती पाहून राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश अंतिम निर्णय घेतील.
  • कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात लॉकडाऊन करता येणार नाही.
आपली प्रतिक्रिया द्या