रेस्टॉरंट लवकरात लवकर सुरू करा; ‘आहार’ संघटनेची मागणी

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे राज्यात बंद असलेल्या हॉटेल – रेस्टॉरेंट सुरु करण्यासाठी द इंडियन हॉटेल ऍण्ड रेस्टॉरेंट असोसिएशने (आहार) सरकारदरबारी धाव घेतली आहे. गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेल्या हॉटेल्स आणि रेस्टॉरेंटमुळे राज्यातील सुमारे 60 लाख कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून यांची गंभीर दखल राज्य सरकारने घ्यावी, अशी मागणी आहारतर्फे करण्यात आली आहे.

राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या बैठकीत आहारतर्फे करील मागणी करण्यात आली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री ऍड. अनिल परब, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप कळसे पाटील, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत आणि खासदार राहुल शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरेंट क्षेत्र हे आपल्याकडे सर्वात जास्त पैशांची उलाढाल होणारी असे हे दुसऱया क्रमांकाचे क्षेत्र आहे आणि आता हा जवळजवळ सात महिने लॉकडाऊनमुळे 60 लाखांपेक्षा अधिक कुटुंबाकर ही वेळ ओढवली आहे. कर्मचाऱयांना अन्न आणि निवारा देण्याची व्यवस्था करण्यात आली होती मात्र आता व्यवसायामध्ये उत्पन्नच नाही तर खर्च कसा भागवणार असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शासनाने यात वेळच्या वेळी लक्ष घालावे अशी विनंती केल्याचे आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या