‘मूह मे राम, बगल मे छुरी’ ही राष्ट्रवादीची नीती, आंबेडकरांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । माजलगाव

राष्ट्रवादी स्वतःला पुरोगामी म्हणवते मग 2014 ला फडणवीस सरकारला पहिला पाठिंबा कोणी दिला? शिवसेना लवकर पाठिंबा देत नव्हती म्हणून यांची घाई होती. राष्ट्रवादीची ‘मूह मे राम, बगल मे छुरी’ अशी नीती असल्याची टीका वचिंत बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या दुटप्पी राजकारणापासून मुसलमानांनी वेळीच सावध व्हावे, त्यांना वंचित आघाडी हाच पर्याय असल्याने आंबेडकर म्हणाले.

बीड लोकसभा निवडणुकीतील वंचित आघाडीचे उमेदवार प्रा. विष्णू जाधव यांच्या प्रचारार्थ रविवारी येथील मोंढा मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले की, आम्ही उमेदवारी देताना जात किंवा त्याची मते बघितली नाही म्हणून वंचित अशा समाजाच्या विष्णु जाधव यांना उमेदवारी दिली. घराणेशाहीने देशात लोकशाही धोक्यात आली आहे. धनदांडगे लोक आमच्याकडे आले होते, त्यांनी आम्ही ठरवू तेच पक्षाचे धोरण राहील अशी आम्हाला ऑफर दिली, पण आम्ही त्याला नकार दिला, असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.