
सामना ऑनलाईन । कोल्हापूर
शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांची रविवारी कोल्हापुरात अतिविराट सभा झाली. या सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या विशेष शैलीमध्ये विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. वाचा उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे.
- लोकसभा आणि विधानसभेवर भगवा फडकणारच – उद्धव ठाकरे
- राष्ट्रवादीला मत देणार असाल तर अजित पवार धरणं कशी भरणार होते ते आठवा – उद्धव ठाकरे
- सगळे रंग एका बाजूला आणि आपला भगवा एका बाजूला – उद्धव ठाकरे
- आपल्या हॄदयातला भगवा विधानसभा आणि लोकसभेवर सुद्धा फडकला पाहिजे – उद्धव ठाकरे
- माथाडी कामगारांचा नेता मला खासदार बनवून दिल्ली मध्ये पाठवायचा आहे – उद्धव ठाकरे
- महाराष्ट्रामध्ये आणि हिंदुस्तानामध्ये शिवप्रेम रक्तामध्ये घेऊनचं नवजात बालकं जन्माला येतात असं जर म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही – उद्धव ठाकरे
- मला खात्री आहे आपलं सरकार पुन्हा आल्यानंतर लवकरात लवकर राम मंदिर उभ राहिल्याशिवाय राहणार नाही – उद्धव ठाकरे
- आम्हाला सत्ता हवी गोर गरिबांसाठी, मजबूत देशासाठी – उद्धव ठाकरे
- समोर शिल्लक कोण राहलयं हेच आता कळत नाही, म्हणुन देवेंद्रजी कृपा करुन शरद पवारांना भाजपामध्ये घेऊ नका – उद्धव ठाकरे
- एक खेळाडू देशाचा पंतप्रधान झाला आणि आमच्याकडे पवार साहेब देशाचे पंतप्रधान पदाच स्वप्न बघणारे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले – उद्धव ठाकरे
- आज दुपारी मी अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि आता मी तिचंचं विराट रूप इथे पाहतोय – उद्धव ठाकरे
- आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी साताऱ्यासाठी हक्काने नरेंद्र पाटील यांना मागुन घेतलं आहे – उद्धव ठाकरे
- पाठीमागुन वार करणारी आपली औलाद अजिबात नाही, वार करू तो समोरून करू – उद्धव ठाकरे



























































