इतिहास घडला, बिगरकाँग्रेसी सरकार सलग दुसऱ्यांदा बहुमताने सत्तेत येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

17 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. एनडीएला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. एनडीएने 352 जागांवर तर भाजपने एकट्याने 303 चा आकडा गाठला. 16 व्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही चांगली कामगिरी भाजप आणि एनडीएने यंदा केली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या, तर  यंदा भाजपने 303 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपने इतिहास घडवला आहे.

सर्व लाईव्ह अपडेट येथे पाहा

इतिहासामध्ये पहिल्यांदाच बिगरकाँग्रेसी सरकार सलग दुसऱ्यांदा बहुमताने सत्तेत आले आहे. याआधी अटल बिहारी वाजयेपी यांनी तीन वेळा भाजप सरकार स्थापन केले होते. परंतु तिन्ही वेळेस सहयोगी पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले होते. परंतु 2014 मध्ये मोदी लाटेत विरोधी पक्ष उडाले आणि पहिल्यांदा बिगरकाँग्रेसी सरकार बहुमताने सत्तेत आले होते. आता पुन्हा एकदा भाजप सरकार बहुमताने सत्तेत आले आहे.