
सामना प्रतिनिधी । मुंबई
येत्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित नेने हिला पुण्याचे तिकीट लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जून महिन्यात संपर्क फॉर समर्थन या अभियानांतर्गत माधुरी दीक्षितची घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी माधुरीला राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. पुण्याच्या जागेसाठी माधुरीच्या नावाचा गंभीरपणे विचार सुरू आहे, अशी माहिती एका भाजपा नेत्याने दिली. माधुरीसाठी ज्या जागेचा सध्या विचार केला जात आहे, त्या जागेचं लोकसभेतील प्रतिनिधित्व सध्या भाजपाचे खासदार अनिल शिरोळे करीत आहेत.


























































