KARJAT: शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत युतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा

77

सामना प्रतिनिधी । कर्जत

खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जतमधील ग्रामदैवताचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराची सुरूवात केली आहे. कर्जत मधील वेणगाव येथील महालक्ष्मी मंदिर, काडावचे जागृत बाल दिगंबर मंदिर आणि नेरळ येथील चेडोब देवस्थानात जाऊन निवडणुकीपूर्वी आशीर्वाद घेतले. तसेच कर्जत मधील शिवसेना, भाजपा, रिपाइं महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन आगामी लोकसभेच्या निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज राहून कामाला लागा, असा संदेश दिला.

खासदार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेचच आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी कर्जतमध्ये येऊन येथील ग्राम दैवतांचे आशीर्वाद घेतले. प्रथम त्यांनी वेणगाव येथील महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर ते वदप, गौरकामात, मार्गे जांभिवली येथील मंदिरात गेले. तिथे दर्शन घेऊन त्यांनी कडाव येथील जागृत बालदिगंबर गणेशाचे मंदिरात जाऊन विधिवत पूजाअर्चा करून आशीर्वाद घेतले. त्यानंतर तिथून पुढे नेरळ येथील चंडोबा देवाचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी त्या त्या भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणुकीच्या कामला जोमाने लागा, असा आदेश दिला. त्यांनतर कर्जत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली.

त्यांच्या या धावत्या कर्जतच्या भेटीत शिवसेनेच्या महिला संपर्क प्रमुख किशोरीताई पेडणेकर, महिला जिल्हा आघाडी प्रमुख रेखा ठाकरे, उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे, तालुका प्रमुख संभाजी जगताप, विधानसभा संघटक संतोष भोईर,तालुका संघटक राजेश जाधव, युवासेना जिल्हा अधिकारी मयूर जोशी, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, शहर प्रमुख भालचंद्र जोशी, भाजपचे देवेंद्र साटम, उपाध्यक्ष वसंत भोईर, दीपक बेहेरे, नगरसेविका स्वामींनी मांजरे, बळवंत घुमरे, आरपीआयचे तालुका प्रमुख राहुल डाळिंबकर, शहराध्यक्ष अरविद मोरे, कार्यालयीन प्रमुख अभिषेख सुर्वे आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या