नीरव मोदीला दिलासा नाही, कोठडीत 27 जूनपर्यंत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nirav-modi-new

सामना ऑनलाईन । लंडन

पंजाब नॅशनल बँकेचा दोन अब्ज रुपयांचा घोटाळा आणि मनी लॉण्डरिंगप्रकरणी नीरव मोदीच्या कोठडीत 27 जुन पर्यंत वाढ करण्यात आली आहे. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठीची सुनावणी लंडनच्या वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात गुरुवारी झाली. या प्रकरणी पुढिल सुनावणी 29 जुलै रोजी होणार आहे.

हिंदुस्थानातून पळून गेलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदी सध्या लंडनच्या वडस्वर्थ कारागृहात आहे. त्याने आपल्याला जामीन मिळावा आणि आपले प्रत्यार्पण रोखावे यासाठी तेथील न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र याआधी त्याच्या दोन याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. त्याने वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात तिसऱ्यांदा अर्ज दाखल केला होता.