चुलबुली आलियावर ‘धकधक गर्ल’ माधुरीनं केलं गारुड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट हिचा ‘गली बॉय’ हा चित्रपट बॉ़क्स ऑफिसवर कल्ला करत आहे. यासह ‘राझी’, ‘उडता पंजाब’, ‘स्टुडंट ऑफ द इयर’ अशा चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या आलिया भट्ट हिने कमी काळात आपला चाहतावर्ग तयार केला आहे. तिच्या अभिनयाचे बॉलिवूडकरांनीही कौतुक केले आहे. परंतु आलियावर मात्र ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित हिनं गारुड केलं आहे.

आलिया आणि माधुरी दीक्षित आगामी कलंक या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहे. या निमित्त दिलेल्या एका मुलाखतीत तिने माधुरीचे कौतुक केलं. ‘माधुरी खूप सुंदर आहे. त्यावेळी मी तिला बघतच बसायचे. अनेकदा तिला बघून भान हरपून जायचं. मग भानावर येण्यासाठी स्वत:ला चिमटे काढावे लागायचे,’ असं आलियानं सांगितलं.

alia-bhatt-madhuri-dixit1

‘कलंक’ या चित्रपटामध्ये माधुरी आणि आलिया एकत्र डान्स करताना दिसणार आहेत अशी चर्चा सिनेवर्तुळात आहे. हे एक शास्त्रीय नृत्य असल्याचीही चर्चा आहे. माधुरीने शास्त्रीय नृत्याचे पूर्ण शिक्षण घेतलेले असल्याने या नृत्यावेळी तिला जास्त प्रयास करावे लागणार नाही, परंतु आलियाला मात्र यासाठी घाम गाळावा लागणार आहे. या चित्रपटामध्ये वरुण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त यांच्याही भूमिका आहेत. 19 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होईल.