
सामना प्रतिनिधी, नाशिक
चांदवडजवळ डावखरनगर व शेळके वस्ती येथे दोन घरांवर दरोडा टाकून दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवित चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटले. यापैकी एका घटनेत एक तरुण जखमी झाला असून ठामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शेळके वस्तीवर शेतकरी समाधान पुंजाराम शेळके यांचे घर आहे. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास चार दरोडेखोरांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून आत प्रवेश केला. समाधान यांच्या हातावर व पोटावर चाकूने वार केले. त्यांची आई सुमनबाई व बहीण सुनीता नाईकवाडे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पळ काढला. या दागिन्यांची किंमत 24 हजार इतकी आहे. जखमी समाधान यांच्यावर चांदवड ठामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुसरी घटना डावखरनगर येथे पहाटे अडीचच्या सुमारास घडली. कृष्णा लक्ष्मण पवार यांच्या घराचा दरवाजा तोडून दरोडेखोर आत घुसले. चाकुचा धाक दाखवित कृष्णा पवार यांच्या पत्नीच्या अंगावरील तीस ठॉम वजनाचे दागिने हिसकावून दरोडेखोर पसार झाले. या दोन्ही गुह्यांची चांदवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
summary- loot in chandwad




























































