स्वयंपाकघर पेटले! एलपीजी सिलिंडर 25 रुपयांनी महागला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
lpg-gas

पेट्रोल शंभरीच्या उंबरठय़ावर असतानाच आता घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. एलपीजी गॅसच्या दरात 25 रुपयांनी वाढ झाली असून अवघ्या 20 दिवसांत गॅस सिलिंडर तब्बल शंभर रुपयांनी महागले आहे. यामुळे सर्वसामान्य जनता आणि मध्यमवर्गीय त्रस्त झाला आहे.

दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडर दराचा आढावा पेट्रोलियम कंपन्यांकडून घेण्यात येतो. परंतु फेब्रुवारीत तीनवेळा दरवाढीचा बोजा जनतेवर लादला आहे. तब्बल 25 रूपयांनी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढविल्या.

20 दिवसांत 100 रुपयांनी दरवाढ

5 फेब्रुवारीला 25 रुपयांनी गॅसची दरवाढ केली. त्यानंतर 16 फेब्रुवारीला 50 रुपयांनी महागला. आज पुन्हा 25 रुपयांनी गॅसची दरवाढ केली. अशाप्रकारे 20 दिवसांत तब्बल 100 रुपयांनी गॅस सिलिंडर महाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जेवण महागणार

पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक महागली आहे. आता एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे हॉटेल, मेसमधील जेवण-नाष्टा महागणार आहे.

एप्रिल-मे 2020 पासून केंद्र सरकारने अचानक गॅसवरील सबसिडी बंद केली. त्यामुळे नागरिकांनी अनुदानित असो किंवा विनाअनुदानित सिलिंडरसाठी पूर्ण एकच दर द्यावा लागत आहे.

अशी आहे दरवाढ

शहर       आज    काल

मुंबई         794     769