तिसर्‍यांदा वाढली गॅसची किंमत, सर्वसामान्यांना फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती वाढत आहेत. काही दिवसांपूर्वीच गॅसची किंमत 50 रुपयांनी वाढली होती. आता पुन्हा गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे.

दिल्लीत घरगुती वापरासाठीचा गॅस 25 रुपयांनी वाढला आहे, त्यामुळे गॅसची किंमत 769 वरुन 794 वर पोहोचली आहे. या महिन्यात दिल्लीत तिसर्‍यांदा गॅसची किंमत वाढली आहे. यापूर्वी 4 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारी रोजी गॅसची किंमत वाढली होती.

डिसेंबर 2020 मध्ये एलपीजी गॅसची किंमत प्रति युनिट 200 रुपयांनी वाढली होती. 15 फेब्रुवारी रोजी दिल्लीत गॅसची किंमत 50 रुपयांनी वाढली होती. तेव्हापासून 14.2 किलोचा एलपीजी गॅस हा 769 रुपयांना विकला जात होता आता त्याची किंमत पुन्हा वाढून 800 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.