
मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या 17 व्या मिफ्फ सोहळ्यात ‘मासा’ या लघुपटाने लक्ष वेधून घेतले. सासू आणि सुनेमधलं नातं हळुवारपणे उलगडणारा आणि अव्यक्त स्त्र्ााr जाणिवा व्यक्त करणारा लघुपट आहे. ‘मासा’ या लघुपटाची कथा अभिनेते आणि लेखक संदेश कुलकर्णी यांनी लिहिली आहे, तर दिग्दर्शिका फुलवा खामकर आहेत.
लघुपटात मुख्य व्यक्तिरेखा रखमा यांचा तरुण मुलगा अपघातात गेल्यानंतर त्या त्यांची सून केतकीसोबत लहानग्या नातवाला सांभाळत, घरोघरी डबे देऊन चरितार्थ चालवत असतात. मुलगा आणि नवरा गेल्यामुळे दोघींच्याही आयुष्यात निर्माण झालेल्या पोकळीतून त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झालेला असतो. त्यात केतकीच्या आयुष्यात एक पुरुष येतो. 75 वर्षांच्या रखमाबाई या घटनेकडे कसे बघतात हे चित्रपटात दाखवले आहे. चित्रपटात रखमाची व्यक्तिरेखा ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी, तर केतकीची भूमिका अमृता सुभाषने साकारली आहे.
‘मासा’चे शूटिंग रायगड जिह्यातील नागाव येथे झाले आहे.नृत्य दिग्दर्शिका म्हणून इतक्या वर्षांचा अनुभव असताना सिनेमाचे- लघुपटाचे दिग्दर्शन करणे हा संपूर्ण वेगळा अनुभव होता. मात्र, नृत्याची, विशेषतः तालाची समज असण्याचा फायदा मला या दिग्दर्शनात झाला, असे फुलवा खामकर यांनी सांगितले.
























































