
शिवसेनेच्या पुढाकारामुळे मढ जेट्टी ते बोरिवलीपर्यंत थेट वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यात आली आहे. पी/उत्तर विभाग प्रभाग समिती अध्यक्षा, नगरसेविका संगीता सुतार यांच्या अथक प्रयत्नांमुळे व बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांच्या सहकार्याने शिवसेना विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या हस्ते या वातानुकूलित बस सेवेचे लोकार्पण करण्यात आले.
मढवासीयांची गेल्या अनेक महिन्यांपासून मढ जेट्टी ते बोरिवली अशी थेट वातानुकूलित बससेवा सुरू करण्याची मागणी होती. या मागणीसाठी शिवसेनेच्या नगरसेविका संगीता सुतार यांनी पाठपुरावा केला होता. ही बस सेवा बोरिवलीवरून पहाटे सव्वापाचपासून ते रात्री पावणेनऊपर्यंत तर मढ जेट्टीवरून सकाळी 6 पासून ते रात्री पावणेअकरापर्यंत आहे.
यावेळी समाजसेवक संजय सुतार,मालवणी-मालाड डेपो व्यवस्थापक अजय महाडिक, महिला विभाग संघटक मनाली चौकीदार, विधानसभा संघटक अनिल भोपी, मालाड विधानसभा प्रभारी किरण कोळी, उपविभाग प्रमुख ऍन्थोनी पॉल, उपविभाग संघटक जयश्री म्हात्रे, शाखाप्रमुख संदेश घरत, अंकित सुतार, मोरेश्वर कोळी, मायकल किल्मो, शैलेश केरकर, अशोक सावे, आदित्य सुतार, भास्कर कोळी, कृष्णा कोळी तसेच शिवसैनिक, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


























































