निष्ठूर मात्यापित्याने नवजात बालकाला जमिनीत जिवंत गाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमधील अशोकनगर जिल्ह्यातील मुंगावली गावात निष्ठूर मात्यापित्याने त्यांच्या नवजात बालकाला जिवंत जमिनीत गाडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने ते बाळ जिवंत होते व वेळीच लोकांनी त्याला जमिनीखालून काढले त्यामुळे त्याचे प्राण बचावले. सध्या या बाळावर स्थानिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंगावली गावातील काही बायका नदी किनारी काम करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना एका बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी शोधाशोध केली मात्र त्यांना बाळ दिसले नाही. मात्र नंतर त्यांच्या लक्षात आले की आवाज झुडुपापलिकडून जमिनीखालून येत आहे. त्यांनी तत्काळ काही गावकऱ्यांना बोलावले. गावकऱ्यांनी अलगद तेथील माती उकरून काढली. त्यानंतर समोर जे दिसले ते पाहून त्यांना धक्का बसला. एक नवजात बाळ कापडात बांधून जमिनीखाली पुरण्यात आले होते.

गावकऱ्यांनी तत्काळ पोलिसांना बोलावले. पोलिसांनी त्या बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.