मंदिरांमध्ये मोबाईलबंदी, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शुद्धता आणि पावित्र्य राखण्यासाठी, इतर भाविकांना होणारा त्रास रोखण्याकरिता तामीळनाडूतील मंदिरांमध्ये मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात येत असल्याचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.

मोबाईल बंद ठेवा, फोटो काढू नका, शांतता राखा, अशा सूचना अनेक मंदिरांमध्ये लिहिलेल्या असतात, मात्र अनेक उत्साही भक्तांकडून मंदिरांमध्ये मोबाईलचा सर्रास वापर केला जात आहे. फोटो काढले जातात. त्यामुळे इतर भक्तांना देवाचे दर्शन घेताना अडचणी येतात. यावर लक्ष वेधण्यासाठी तामीळनाडूतील तिरुचेंदुरच्या प्रसिद्ध सुब्रमण्य स्वामी मंदिर प्रशासनाने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आमच्या मंदिरात मोबाईलबंदी घालावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली, मात्र उच्च न्यायालयाने तामीळनाडूतील सर्व मंदिरामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी घातली आहे. मंदिरांमधील शुद्धता आणि पावित्र्य जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.