मुस्लिम व्यक्ती बहुविवाह करू शकतात- मद्रास उच्च न्यायालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्लामिक कायद्यात मुस्लिम व्यक्तीला एकापेक्षा जास्त म्हणजे जास्तीत जास्त 4 महिलांसोबत विवाह करण्याची परवानगी आहे. परंतु त्या व्यक्तीने जर चार विवाह केले असतील तर त्या व्यक्तीने चारही महिलेसोबत समान वागणूक द्यायला हवी, असा महत्त्वपूर्ण निकाल मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी एका प्रकरणात सुनावणी करताना दिला. जर त्या व्यक्तीने समान वागणूक न देता पत्नीसोबत दुजाभाव केला असेल तर ती क्रूरता मानली जाऊ शकते, असेही न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले. न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. पहिली पत्नी असूनही पतीने चांगली वागणूक दिली नाही. गरोदरपणात मला गर्भपात करावा लागला, असे महिलेने म्हटले आहे. मात्र पतीने हे सर्व आरोप फेटाळले. परंतु न्यायालयाने कागदपत्रे आणि पुराव्याच्या आधारे महिलेची बाजू खरी असल्याचे नमूद करीत घटस्फोट मान्य केला.