
सामना प्रतिनिधी । नगर
‘प्रभु रामचंद्रकी जय,’ ‘जय श्री राम,’ ‘मंदीर वही बनायेंगे,’ ‘पहिले मंदिर, फिर सरकार’ अशी जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेच्या वतीने आज नगर शहरामध्ये नेता सुभाष चौकातील श्रीराम मंदिरात शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.
दरम्यान, नगर जिल्हयात सर्वत्र महाआरतीचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार, माजी महापौर भगवान फुलसौंदर, योगीराज गाडे, नगरसेवक गणेश कवडे, सुरेश तिवारी, संतोष गेणप्पा, संतोष बिज्जा, अशोक दहिफळे, दिलीप लोंढे, सतिष मैड, गणेश अष्टेकर, सुमित कुलकर्णी, संग्राम शेळके, पारुनाथ ठोकळ, युवा सेनेचे जिल्हाधिकारी विक्रम राठोड, महिला आघाडीच्या अरुणाताई गोयल, आशा निंबाळकर, शशिकला राठोड, सुशमा डहाळे, टीनु भंडारी यासह शिवसैनिक युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्ये उपस्थित होते. येथील नेताजी सुभाष चौकात जय श्री रामाच्या जोरदार घोषणा देऊन हा परिसर दुमदुमुन गेला होता.
































































