
कोरोना विषाणूच्या फैलावामधे वाढ झाल्यामुळे कालावधी कमी करून दहा दिवसांचे करण्यात आलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजले. आता पावसाळी अधिवेशन 5 जुलैला सुरू होईल.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करण्यात येत असून पावसाळी अधिवेशन 5 जुलैपासून सुरू होईल असे जाहीर केले. अर्थसंकल्पीय अधिवेशन कोरोनाचे रुग्ण राज्यभर वाढत असल्याने केवळ दहा दिवसांचे करण्यास कामकाज सल्लागार समितीने मान्यता दिली होती. त्यानुसार 1 मार्चपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात प्रत्यक्ष कामकाज
आठ दिवसच झाले आणि राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी 8 मार्चला मांडला. या अधिवेशनात दोन्ही सभागृहांत मिळून सहा विधेयके मंजूर करण्यात आली. पण अर्थसंकल्प मंजूर करून घेणे ही अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वैधानिकता या अधिवेशनात पार पाडण्यात आली.




























































