राज्यात 23,446 नवे कोरोना रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात दिवसभरात 23 हजार 446 रुग्णांची नोंद झाली असून 14 हजार 253 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत 7 लाख 715 रुग्ण बरे झाले असून 2 लाख 61 हजार 432 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज 448 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.85 टक्के एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 49 लाख 74 हजार 558 नमुन्यांपैकी 9 लाख 90 हजार 795 नमुने पॉझिटिव्ह (19.9 टक्के) आले आहेत. राज्यात 16 लाख 30 हजार 701 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 38 हजार 220 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात 2,371 कोरोना रुग्ण

मुंबईत गुरुवारी दिवसभरात 2,371 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत 1,367 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 1 लाख 28,112 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 38 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 38 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 8 हजार 20 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 61 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 26 हजार 632 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 8 लाख 72 हजार 155 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 63,115 वर पोहोचली आहे.