महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैज्ञानिक क्षेत्रातील उत्पृष्ट कार्यासाठी आज महाराष्ट्रातील चार शास्त्रज्ञांना पेंद्र शासनाचा मानाचा ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार 2020’साठी एपूण सात श्रेणींमध्ये 14 वैज्ञानिकांना पुरस्कार जाहीर झाले असून यात महाराष्ट्रातून मुंबई आणि पुणे येथील प्रत्येकी दोन अशा एपूण चार शास्त्रज्ञांचा समावेश आहे.

विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिपदेच्या वतीने (सीएसआयआर) संस्थेच्या एसएस भटनागर सभागृहात आज 79व्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान, भूविज्ञानमंत्री तथा सीएसआयआरचे उपाध्यक्ष डॉ. हर्ष वर्धन यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात सीएसआयआरचे महासंचालक तथा विज्ञान आणि औद्योगिक संशोधन विभागाचे सचिव डॉ. शेखर मांडे यांनी वर्ष 2020 च्या ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’ विजेत्या वैज्ञानिकांच्या नावाची घोषणा केली. एपूण सात श्रेणींमध्ये प्रत्येकी दोन अशा एपूण 14 वैज्ञानिकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. 5 लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

एचआरडीजी आणि सीएसआयआरच्या सर्व प्रयोगशाळांचे प्रमुख ए. चक्रवर्ती तसेच अन्य विभागांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमास उपस्थित होते.

अभियांत्रिकी विज्ञान श्रेणीमध्ये दोन्ही पुरस्कार महाराष्ट्राला

अभियांत्रिकी विज्ञान श्रेणीमधील दोन्ही पुरस्कारांवर राज्यातील वैज्ञानिकांनी आपली नाममुद्रा उमटविली आहे. सीएसआयआरप्रणीत पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या रासायनिक अभियांत्रिकी आणि प्रक्रिया विकास विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अमोल पुलकर्णी आणि मुंबईतील भाभा अणुसंशोधन पेंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. किंशुक दासगुप्ता हे या श्रेणीत विजेते ठरले असून त्यांना शांतिस्वरूप भटनागर हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

आयआयटी मुंबईच्या दोन वैज्ञानिकांना पुरस्कार

आपल्या कार्यकर्तृत्चाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविणाऱया मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) दोन वैज्ञानिकांनी दोन वेगवेगळय़ा श्रेणींमध्ये हा पुरस्कार पटकावला आहे. संस्थेच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. सूर्येंदू दत्ता यांना पृथ्वी, वातावरण, समुद्री व ग्रह विज्ञान श्रेणीमध्ये तर गणित विभागाचे शास्त्रज्ञ
डॉ. यू. के. आनंदवर्धन यांना गणिती विज्ञान श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे.