
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज लोणार सरोवर जतन आणि संवर्धन समितीने सूचविलेल्या प्रस्तावित विकास आराखड्यातील कामांसाठी 107 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. लवकरच या कामांचे टेंडरींग प्रोसेस पूर्णत्वास जावून या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 फेब्रुवारीला लोणारला येऊन सरोवर विकासाच्या बाबतीत येणार्या अडचणी समजून घेतल्या आणि राज्याचे नव्हे तर देशाचे वैभव असलेल्या विश्व विख्यात सरोवराचे जतन संवर्धन आणि विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही दिली. त्यानुसार 3 दिवसातच मुख्यमंत्री ठाकरे यांनी लोणारच्या प्रस्तावित विकास आराखड्यातील कामांसाठी 107 कोटी रुपयांच्या निधिला मंजुरात दिली असून लवकरच या कामांचे टेंडरींग प्रोसेस पूर्णत्वास जाणार आहे आणि प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे.
































































