
जुलै महिन्यात देशात GST संकलन 33 टक्क्यांनी वाढलं आहे. सर्वाधिक कर महाराष्ट्रातून संकलित झाला आहे, तर सर्वात कमी कर मिझोरम राज्यात संकलित झाला आहे. महाराष्ट्रातून 18 हजार 999 कोटी रुपये कर जमा झाला आहे. तर मिझोरममधून 21 कोटी रुपये GST जमा झाला आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भाजप शासित राज्यात GST संकलनाचे प्रमाण कमी आहे. तर तुलनेत बिगर भाजप राज्यात कर संकलनाचे प्रमाण अधिक आहे.
✅₹1,16,393 crore gross GST revenue collected in July
✅The revenues for the month of July 2021 are 33% higher than the GST revenues in the same month last year.Read more➡️ https://t.co/V6sUZl9qU1 pic.twitter.com/1hmVIVpY6W
— Ministry of Finance (@FinMinIndia) August 1, 2021
देशातील 17 राज्यांत भाजप आणि सहकारी पक्षांचे सरकार आहे. या 17 राज्यात जुलै महिन्यात जीएसटीच्या रुपात 33 हजार 235 कोटी रुपये जमा झाले आहेत. तर तुलनेने बिगर भाजप शासित राज्यांत 53 हजार 280 कोटी रुपये कर जमा झाला आहेत. इतकेच नाही तर गेल्या वर्षीच्या तुलेत भाजपचे शासन असलेल्या राज्यात 23 टक्क्यांनी कर संकलन वाढले आहे. तर बिगर भाजपशासित राज्यात कर संकलन 34 टक्क्यांनी वाढले आहे.
भाजपशासित राज्य मध्य प्रदेशमध्ये 16 टक्क्यांनी कर संकलन वाढले आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये 18 आणि गुजरातमध्ये 36 टक्क्यांनी कर संकलन वाढले आहे. तर बिगर भाजपशासित राज्य झारखंड आणि ओडिशा राज्यात 54 टक्क्यांनी कर संकलन वाढले आहे. तर महाराष्ट्रात 51 टक्क्यांनी कर संकलन वाढले आहे.
पुद्दुचेरीमध्ये राजीव काँग्रेस आणि भाजपची सत्ता आहे. या केंद्रशासित प्रदेशात एक टक्क्यांनी कर संकलन घटले आहे. तर मेघालय आणि मणिपूरमध्ये एनडीएची सत्ता असून अनुक्रमे 1 आणि 6 टक्क्यांनी कर संकलन वाढले आहे.




























































