
दहावी पास उमेदवारांसाठी भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक पदासाठी बंपर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी राज्यात तब्बल 2 हजार 508 जागा उपलब्ध आहेत.
ब्रँच पोस्टमास्तर (बीपीएम), असिस्टंट ब्रँच पोस्टमास्तर (एबीपीएम) पदाच्या देशभरात 40 हजार 889 जागा रिक्त आहेत. या जागांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया 16 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुक उमेदवार या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून दहावीच्या वर्गात गणित आणि इंग्रजी विषय शिकलेला असावा. उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 40 वर्षांपर्यंतच असावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार कमाल वयामध्ये सवलत देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. महिला आणि सर्व अनुसूचित जातीतील उमेदवारांना या शुल्कातून सूट देण्यात आली आहे.






























































