28 फेब्रुवारीला राज्याचा अर्थसंकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. 28 फेब्रुवारीला विधानसभेत अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. 26 फेब्रुवारीला पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होईल. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव सादर केला जाईल. अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल. सन 2023-24च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येतील आणि त्यानंतर शासकीय कामकाजाला सुरुवात होईल. 28 फेब्रुवारी रोजी सन 2024-25चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. दुसऱया दिवशी अंतरिम अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा करण्यात येणार आहे.