महामोर्चाच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीचे बैठकसत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

17 डिसेंबरच्या महामोर्चासाठी महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरू आहे. आघाडीतील घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या सातत्याने बैठका सुरू आहेत. मोर्चाच्या नियोजनाची जबाबदारी प्रत्येकाला ठरवून दिली जात आहे. मोर्चाला येणाऱया लाखो लोकांची नीट व्यवस्था व्हावी यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अपार मेहनत घेत आहेत.

मुंबई आणि महाराष्ट्रातून या महामोर्चासाठी दीड लाख ते पावणेदोन लाख लोक येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आघाडीच्या पदाधिकाऱयांची आज भायखळा येथील रिचर्डसन अॅण्ड क्रूडास पंपनीमध्ये बैठक झाली. मोर्चेकऱयांच्या बसेस भायखळा जंक्शनपर्यंत येतील आणि त्यानंतर बसमधील लोक रिचर्डसन अॅण्ड क्रूडास पंपनीमध्ये जमतील. या पंपनीत पावणेदोन लाख लोक जमा होऊ शकतील इतकी व्यवस्था आहे. तिथून नंतर ते मोर्चामध्ये सहभागी होतील. मोर्चेकऱयांसाठी पिण्याचे पाणी व अन्य आवश्यक व्यवस्थेबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीला शिवसेना आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, उपनेते सचिन अहिर, मनोज जामसुतकर, आमदार सुनील शिंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महामोर्चाबाबत सविस्तर चर्चा करताना महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते.