संक्रांतीला देऊया मास्कचं वाण, सिल्क -खणाला पसंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संक्रांत म्हटली की हळदीकुंककाचा कार्यक्रम आलाच आणि हळदीकुंकू म्हटले की वाण आलेच. वाण म्हणजे संक्रांतीनिमित्त महिलांना भेटकस्तू देणे. अशी लहान कस्तू, जी घरात महिलांना उपयोगी पडेल किंवा वैयक्तिक वापरासाठी कामी येईल. यंदाची मकरसंक्रांती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरी होत आहे. त्यामुळे ती खबरदारी घेऊन साजरी करण्याकडे कल दिसत आहे. यावर्षी वाण म्हणून देण्यात येणाऱया वस्तूंमध्ये मास्क आणि सॅनिटायरच्या बाटलीचाही समावेश होणार आहे. तसे रंगीबेरंगी, आकर्षक मास्कबद्दल चौकशी करताना किंवा ऑर्डर देताना महिला दिसत आहेत.

खणाची साडी किंवा खणाचा ड्रेस वापरण्याची फॅशन पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे खणाचे, जरीकाम केलेल्या मास्कला पसंती मिळताना दिसत आहते. 60रुपयांपासून त्यांच्या किंमती सुरू होतात. आपल्या आवडीनुसार असे मास्क बनवून दिले जातात.

सिल्कच्या साड्यांपासून तयार केलेले, कॉटन खण आणि कलमवारी मास्कदेखील ग्राहकांना आवडत आहेत. ते दोन्ही बाजूने वापरता येतात. त्याही पुढे जाऊन थोडे महाग असे पैठणी मास्क देखील बनवले जात आहेत. त्याच्या किंमती 100 ते 120 रुपयांपासून सुरू होतात. फेसबुकवरील अनेक ग्रुप्समध्ये अशा मास्कला प्रसिद्धी देण्यात येतेय.