
सामना ऑनलाईन, मुंबई
बॉलीवूडमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे ती मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाची. हे दोघेही 19 एप्रिलला लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. या लग्नाविषयी फारच कमी लोकांना माहिती असून हा सोहळा ख्रिस्ती पद्धतीने होणार आहे. या लग्नसोहळ्यात केवळ कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींनाच आमंत्रण असेल. मलायकाकडून करीना कपूर, करिश्मा कपूर, करण जोहर तर अर्जुनकडून रणवीर आणि दीपिका या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या लग्नाला 18 वर्षे झाली आहेत. एवढी वर्षे संसार केल्यावर हे दोघेही विभक्त झाले. त्यानंतर अरबाज अनेकदा प्रेयसी जॉर्जिया एण्ड्रीयानीसोबत दिसला. अरबाज आणि जॉर्जिया लवकरच लग्न करणार असल्याची देखील चर्चा आहे.





























































