
हिंदुस्थानच्या कणखर भूमिकेनंतर मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी मंगळवारी चीनकडे मदतीची धाव घेतली आहे. मालदीवमध्ये अधिक पर्यटक पाठवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे.
चीनच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले मुइझू हे फुजियान प्रांतातील मालदीव बिझनेस फोरमला संबोधित करत होते. चीन हा मालदीवचा सर्वात जवळचा मित्र असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले, ‘चीन हा आपला सर्वात जवळचा मित्र आणि विकासातील भागीदार आहे.
त्याच्या अधिकृत वेबसाइटवर पोस्ट केलेल्या माहितीपत्रानुसार, ‘कोविडपूर्वी चीन आमची (मालदीवची) प्रथम क्रमांकाची बाजारपेठ होती आणि चीननं पूर्वीसारखीच परिस्थिती निर्माण करण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत अशी माझी विनंती आहे’, अशी विनंती केल्याचं दिसत आहे.
मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुस्थानविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह विधानांवरून वाद निर्माण झाल्यानंतर हिंदुस्थानच्या पर्यटकांनी आरक्षणं रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर मुइझ्झूचे यांनी मदतीसाठी चीनकडे धाव घेतली आहे.




























































